Tag Archives: Kumar Gandharva

विद्रोह हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे – डॉ. गिरीश कर्नाड

Standard

_MG_9537.JPG

 

कबीर कला मंच च्या सीडीचे प्रकाशन

मुंबई / अजेयकुमार जाधव

आज प्रत्येक स्वतंत्र नागरिकांना विद्रोह माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे बोलण्याचा अधिकार आहे असे मत सुप्रसिद्ध नाट्य सिनेकलावंत डॉ. गिरीश कर्नाड यांनी व्यक्त केले.कबीर कला मंचच्या गाण्यांच्या सीडीचे प्रकाशन कर्नाड यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी टे बोलत होते.

कोणत्याही कलाकारांच्या विरोधात अन्याय झाल्यास त्याचा निषेध करायलाच हवा.कबीर काल मंच हा दलित सांस्कृतिक ग्रुप आहे. यामधील कलाकार हे आपला अनुभव कथन करत होते यामुळे त्यांना देशाचे शत्रू समजून जेल मध्ये टाकले जाते. अशा लोकाना जेल मध्ये टाकणे चुकीचे आहे. समाजात ही भीती पसरवली जात असून पोलीसच ही भीती निर्माण करतात असे कर्नाड म्हणाले.

मावोइस्ट व नक्सालीस्ट याचे नेमके नियम काय आहेत असा प्रश्न उपस्थित करून जर या लोकांची पुस्तके घरी ठेवणे, वाचणे हे चुकीचे असेल तर माझ्या घरात मावोइस्ट व नक्सालीस्टची पुस्तके आहेत या पुस्तकांचे मी वाचन करतो म्हणून मी सुद्धा मावोइस्ट व नक्सालीस्ट आहे असे कर्नाड म्हणाले. विनायक सेन व असीम त्रिवेदी यांच्या बाबत सरकार वेगवेगळी भूमिका घेते याचा निषेध व्यक्त करून विद्रोही लेखक सुधीर धवळे यांना सोडवण्यासाठी जे काय करता येईल टे करून धवळे यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे कर्नाड म्हणाले.यावेळी डॉली ठाकूर, माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर, कॉम्रेड प्रकाश रेड्डी उपस्थित होते.

Anand Patwardhan – donates his National Award to Kabir Kala Manch

Standard

Anand Patwardhan announces his donation of Rs.51,000 he received from the government of Maharashtra for his film Jai Bhim Comrade towards the Kabir Kala Defense Committee